भाविकांचा उत्साह
जळगाव (प्रतिनिधी) : – प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विचार वारसा फाउंडेशन आयोजित भव्य महाआरती व उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. विचार वारसा फाउंडेशनच्यावतीने परिसरात सजावट करण्यात आली होती.
प्रभू राम, लक्ष्मण,सीता यांचा सजीव देखावा देखील सादर केला होता. यावेळी आरतीसाठी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, राजेंद्र घुगे पाटील, उमेश सोनवणे, भूषण लाडवंजारी, गणेश पाटील, राजेंद्र देशमुख, अंकुश निकम, किशोर मांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अलकनंदा देशमुख, संगीता राजपूत, सुरेखा निकम, सुनीता डांगे, सुषमा काकडे, रंजना बाविस्कर, मीरा पाडळकर ,कल्पना सनसे, विजया मांडोळे, रिता वाघ, भारती जाधव, रंजना बरहाटे आदींनी परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाला विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, राहुल देशमुख, आशिष राजपूत ,मयुर डांगे,दीपक सनसे,मंगेश मांडोळे, अभिजीत राजपूत,गौरव डांगे,संकेत म्हस्कर,आकाश तोमर, सोपान जाधव ,चेतन राजपूत, गणेश पाटील, लोकेश निकम, लोकेश निकम ,मुकेश तायडे,शरद सोनवणे,संदिप चौधरी,संदिप सोनवणे, नितेश वाघ,पार्थ वाघ आदींनी आयोजन केले.