नाशिक ( प्रतिनिधी ) – विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 सप्टेंबररोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी कळविले आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.







