नगरदेवळा (वार्ताहर) – येथील उपसरपंच विलास पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केलेल्या आदेशाला नासिक विभागीय अप्पर आयुक्त यांनी 20 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती. परंतु स्थगितीला मुदतवाढ मिळावी म्हणून पाटील यांनी केलेला अर्ज आता नामंजूर केला आहे.
नगरदेवळा येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी यांच्या बाजूने निकाल देत विलास पाटील यांना पदावरुन अपात्र घोषित केले होते. त्यावर विलास पाटील यांनी अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले असता त्यावर सुनावणी होऊन अप्पर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला 20 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली होती. आता ही स्थगितीची मुदत वाढवण्यास विभागीय आयुक्तांनी नकार दिला आहे.