जळगाव (प्रतिनिधी) – दिल्ली येथे राजपथवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं तसेच राष्ट्रपती, दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त वंदे भारतंम या सांस्कृतिक कार्यक्रममध्ये जळगावचा भवरलाल अँन्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा ग्रुप सहभागी झाला होता. जैन फाऊंडेशनचा कलावंत वेदांत बागडे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. भवरलाल अँन्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा कलावंत वेदांत बागडे जळगावला आल्यानंतर वेदांतची काकू आशा अजय बागडे यांनी औक्षण केले तर आई राधिका बागडे व वडील नरेश बागडे यांनी वेदांतला पेढा भरवुन आनंद व्यक्त केला. यावेळी जळगाव येथील एलसिबी पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी सुधाकर अंभोरे, आंतरराष्ट्रीय धावपटू संजय मोती, महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारीचे माजी चेअरमन संजय ढंढोरे, यांनी वेदांतला पुष्पहार घालून कौतुक केले. वेदांतला भाग्यश्री पॉलिमर्सचे संचालक सचिन लढ्ढा यांच्यासह कंजरभाट समाज व पत्रकार मंडळी तसेच सोनी नगर परीसरातील मित्र मंडळी व नागरिकांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.