पारोळा (प्रतिनिधी) – गोल्डन केअर क्लब बेंगलोर व कानाथल्ली फाउंडेशन तेलंगणा या दोन्ही संस्थेमार्फत जवाहरलाल नेहरु नॅशनल पुरस्कार राजवड तालुका पारोळा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका पाकीजा उस्मान पटेल यांना बहाल करण्यात आला
14 नोव्हेंबर बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक व सामाजिक उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.








