एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात संशयित केले निष्पन्न
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडदा येथे बांधकाम साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या २४ तासांत संशयित आरोपी निष्पन्न करून एमआयडीसी पोलिसांनी भरीव कामगिरी केली आहे.
तालुक्यातील वावडदा येथे दि. २० रोजी गावातील मारुती मंदीराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरुन कोणीतरी अज्ञात ईसमाने सेंट्रींग बांधकामाचे साहीत्य चोरुन नेले होते. म्हणून सदर बाबतीत पोलीस पाटील विनोद तुळशिराम गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ईसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर हि चोरी ही वावडदा गावातील इसमाने केली असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संशयित सागर विनोद चव्हाण (वय ३२ वर्ष) व विनोंद रमेश गोपाळ (वय २५ वर्ष, दोन्ही रा. वावडदा ता जि जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांचेकडुन गुन्हयातील बांधकामाचे साहीत्य जप्त करण्यात आले होते.
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी आसाराम मनोरे, पोउनी दत्तात्रय पोटे, पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेका. रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील, पोना. सचीन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, मनोज पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर यांनी केली आहे.