जळगाव (प्रतिनिधी ) – वावडदे विकास सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी दि. १६ रोजी झालेल्या निवडणुकीत श्रीमती शशिकला प्रकाश पाटील यांची चेअरमनपदी, तर पोपट फकीरा पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीमुळे सोसायटीच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सोसायटीचे सदस्य सुरेश पाटील, अनिल भोळे, सुधाकर येवले, संजय पाटील, मोतीलाल पाटील, अनिल गवळी, मिश्रीलाल राठोड, पूनम वंजारी यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कापडणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी वाहेद तडवी, सचिव संजय पाटील आणि शिपाई राजू मराठे यांनी परिश्रम घेतले.









