चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – येथील वसुंधरा फाउंडेशनतर्फे ‘ दिवाळी सर्वांची – सर्वांसाठी ‘ उपक्रमात नगर परिषद शाळांमधील 220 विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले .

वसुंधरा फाउंडेशनतर्फे ‘ दिवाळी सर्वांची – सर्वांसाठी ‘ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ‘आहे . दिवाळी सणाच्या निमित्ताने नगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या क्रमांक 1, 4, 7, 16 या चार शाळेतील 220 विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. तांडा वस्ती व आदिवासी कुटुंबांमध्ये दिवाळी साजरी करता यावी यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे यावे असे प्रतिपादन उपक्रमशील शिक्षक सचिन पाटील यांनी यावेळी केले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पाटील ( जि.प.प्रा. शाळा पिंप्री खुर्द ) , प्रितेश कटारीया ( माजी अध्यक्ष जेसीआय चाळीसगाव सिटी), चित्रकार धर्मराज खैरनार, प्रा खुशाल कांबळे उपस्थित होते.
यावेळी शिक्षक निवृत्ती उंबरकर, कैलास पाटील, अविनाश चव्हाण, अनिल पेटे, ज्ञानेश साळुंखे, दिनेश पाचलुरे, अविनाश साखरे, नितीन राठोड, शिक्षिका राखी ठोके, प्रतिभा पाटील उपस्थित होत्या.







