जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांच्या वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाच्या दिनदर्शिकेचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,नेत्रतज्ज्ञ डॉ. रेणुका पाटील उपस्थित होते. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभरातील विविध कार्यक्रम, सण, उत्सवांची माहिती देण्यात आली आहे. याबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, नियमित सकाळी ५ वाजता गोदावरीमध्ये ह.भ.प.जगन्नाथ महाराज नेत्रालयात मोतीबिंदू शास्त्रक्रिया सुरू होतात आणि हे मागील १० वर्षांपासून नियमितपणे सुरू असून हा आदर्श निश्चित कौतुकास्पद असून सातत्य म्हणजे डॉ. नितु पाटील असे गौरवोद्गार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ नितु पाटील यांनी आजपर्यंत ३०,००० च्या वर यशस्वी मोतीबिंदू केल्या आहेत. फक्त एक नेत्ररोग म्हणून ते पंचक्रोशीतील प्रसिद्ध नसून ते एक सामाजिक,धार्मिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. वासुदेव नेत्रालयातर्फे ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान केलेल्या नागरिकांना ते ५० टक्के तपासणीमध्ये सूट देतात. शिवाय कोरोना काळामध्ये देखील त्यांनी रुग्णांच्या रुग्णांना औषधे आणि बेड उपलब्ध करण्यापासून तर विविध शासकीय प्रस्ताव तयार करण्यापर्यंत त्यांनी मदत केली आहे. ते स्वतः नर्मदा परिक्रमावासी असल्याने अध्यात्मामध्ये देखील त्यांची विशेष रुची आहे. दर महिन्याच्या दुसर्या शनिवारी वासुदेव नेत्रालयाच्या प्रांगणामध्ये रेवा कुटीमध्ये ते सामूहिक हनुमान चालीसा पठण करतात.









