मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात एका वासरासोबत अल्पवयीन युवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली असून यामुळे तालुक्यातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. एक दिवस मुक्ताईनगर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
एका गावात शेतकऱ्याच्या खळ्यात एका तरूणाने गोवंशाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात ४० वर्षीय व्यक्तीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या अनुषंगाने पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित हा अल्पवयीन आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र चाटे हे करत आहेत.