सोयगाव तालुक्यात वरठाण येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- गोठ्यात चारा टाकण्याचे काम करीत असताना बैलाने केलेल्या भीषण हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. २९ रोजी वरठाण, ता. सोयगाव येथे घडली आहे. या घटनेची बनोटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
धनसिंग नत्थू सोळंके (वय ६५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. ते दि. २९ रोजी गुरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेले. बैलाने धनसिंग सोळंके यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना गंभीर जखमी केले. काही युवक यावेळी बाजूने जात होते. त्यांनी सोळंके यांच्या परिवाराला माहिती दिली. त्यांना पाचोरा येथे उपचारासाठी आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला. धनसिंग सोळंके हे सुपडू सोळंके यांचे वडील तर कजगाव येथील अशोक प्रताप पाटील यांचे मेव्हणे होत. या घटनेची बनोटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.