डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये भरला नव उदयोजकाचा मेळा
जळगाव (प्रतिनिधी):- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स, जळगाव येथे दिनांक १२ व १३ मार्च रोजी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या स्वनिर्मित वस्तूंचे वर्षोल्हास २के२ प्रदर्शनाचे उदघाटन प्रिन्सेस किवा वैभव पाटील यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.


यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील,डॉ. वर्षा पाटील आणि डॉ. प्रशांत वारके यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकता, कौशल्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोनातून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन केले आहे. यामध्ये बांधणी साड्या, दुपट्टे, पर्स व बॅग, स्केचिंग केलेल्या बॅग, विविध प्रकारचे वन पीस ड्रेस, घागरे, पेंटिंग व फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी, नेल आर्ट, सौंदर्यप्रसाधने, मॅक्रमे वस्तू, आरीवर्क ब्लाऊज, एम्ब्रॉयडरी रुमाल, ग्रीटिंग्स, फोटो फ्रेम, रंगोली, ज्वेलरी व हाताने बनवलेले ज्वेलरी किट यांसह अनेक आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. तसेच विद्यार्थिनींनी तयार केलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि मुखवास देखील या प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आले आहेत.

या प्रदर्शनातून विद्यार्थिनींच्या सर्जनशीलता, कौशल्य आणि उद्योजकीय वृत्तीचे उत्कृष्ट दर्शन घडले. विद्यार्थिनींना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि स्वनिर्मित वस्तूंची विक्री करून उद्योजकतेचा अनुभव घेण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे.या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. कविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीनल राणे, कविता भोरटक्के, जयश्री कुलकर्णी, हिमानी जमाले आणि शुभांगी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तरीीहेश्रश्रहरी २घ२६ या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थिनींच्या कलात्मक व उद्योजकीय क्षमतेला चालना देणारा हा उपक्रम ठरत आहे.









