पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आ. अमोल चिमणराव पाटील यांचा विजयी झाल्याबद्दल एच.एस.सी.१९९३ बॅच मधील वर्गमित्रांनी सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.
आ. अमोल पाटील यांनी अधिक जोमाने मतदारसंघातील जनतेची कामे करावीत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, विलास पाटील, गणेश पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, उपरे सर, सुनील भालेराव, जयेश पाठक, विशाल पाठक, राजेंद्र महाजन, रवींद्र सोनार, सुनील सोनार, रतिलाल भंडारी आदी मित्रांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.