जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या वर्धमान विद्यालयामध्ये अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून २५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील सावखेडा शिवारात वर्धमान इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत एका कार्यालयात २५ हजारांची रोकड व कागदपत्रे ठेवली होती. चोरट्यांनी शाळेच्या मागील कंपाऊंडच्या भिंतीवरून आत प्रवेश करत शाळेच्या मुख्य इमारतीच्या गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर शाळेच्या कार्यालयातील २५ हजार रुपयांची रोकड व काही कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी प्राध्यापक आशिष चंद्रकांत अजमेरा यांनी गुरुवार २४ मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहेत.