भुसावळ ( प्रतिनिधी ) – जाडगाव – वरणगाव रोडवर धावत्या इंडिका कारने अचानक पेट घेतल्यावर ती जळून खाक झाली कारमध्ये एकटा चालक असल्यामुळे कारने पेट घेतल्याचे तात्काळ लक्षात आले. चालक खाली उतरताच कारचा स्फोट झाला
काही दिवसापासून बंद असलेली कार मालक ईश्वर सपकाळे घरी घेऊन येत होते. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली. गाडीतुन खाली उतरल्याक्षणी गाडीने मोठा पेट घेतला. ड्रायव्हर खाली उतरल्यामुळे जीवितहानी टळली.