• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वराह पालनाचा वाद : तरुणाची पेट्रोल ओतून घेत आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वराह पालनाचा वाद : तरुणाची पेट्रोल ओतून घेत आत्महत्या

संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला तहसील कार्यालयात

चौघांना अटक, अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : नेहमीच्या मारहाणीला कंटाळून तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरूड येथे घडली. मृतासह रुग्णवाहिका बुधवारी थेट अमळनेर तहसील कार्यालय आवारात नातेवाईकांनी आणली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, रुग्णवाहिका येथून हलणार नाही असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. पोलिस निरीक्षकांनी योग्य तो न्याय देऊ असे सांगितले. अखेर चौघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

विलास भाईदास घिसाडी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तो कुटुंबासमवेत शिरूड गावी राहत होता. त्याच्या घराच्या मागील बाजूस असलेला वराह पालनाचा व्यवसाय आहे. यांच्या घराच्या मागच्या बाजूला रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर, सुदाम भुरा वडर हे लोक राहतात. घिसाडी यांची मोकाट डुकरे आजूबाजूच्या घरांमध्ये घुसून अन्न धान्याची नासाडी करतात म्हणून त्यांच्यात वाद होते.

दिनांक २५ रोजी सकाळी विलास कन्हेरे फापोरे येथे गेले होते. दुपारी तीन वाजता विनोद वडर याच्या डुकरांनी पुन्हा अन्न धान्याची नासाडी केली म्हणून विलासला चौघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विलास याने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याने धुळे पोलिसांना चौघांविरुद्ध जबाब दिला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताच्या नातेवाईकांनी दिनांक २६ रोजी शव तहसील कार्यालयात आणले. मात्र यावेळी शिक्षक मतदार संघाचे मतदान सुरू असल्याने शव आणणारी रुग्णवाहिका बाहेरच थांबवण्यात आली. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी लावून धरली. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात.

याप्रकरणी गणेश भाईदास घिसाडी यांच्या फिर्यादीवरून रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर व सुदाम भुरा वडर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पैकी विनोद, प्रवीण व सुदाम यांना अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

मुख्याध्यापकांना १० हजाराची लाच स्वीकारताना अटक

Next Post

भीषण ट्रक-दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण ट्रक-दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

भीषण ट्रक-दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon