पारोळा (प्रतिनिधी) सर्व सदस्य एकजुटीने राहून बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून वंजारी- बोदर्डे गावाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ संचालक चतुर पाटील यांनी वंजारी बोदर्डे ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्काराचे कार्यक्रमाप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. बाळासाहेब पाटील यांनी गावासाठी तीन सिमेंट बाकचे लोकार्पण तसेच गावातील सर्व आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एन आर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम.चौधरी, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राम चैतन्य बापू आश्रम चे दगडू महाराज, रमेश चौधरी, दीपक गिरासे,अनिल चौधरी यांचेसह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य वनमाला माधवराव (बाळासाहेब) पवार, सुनंदा युवराज पाटील, प्रमिलाबाई मन्साराम पाटील, हिराबाई रावण भिल, अजय देवा ठाकरे, प्रमोद भिमसिंग पाटील, जितेंद्र गोकुळ पाटील यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी आपल्या ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली, यापुढे सर्व योजना आपल्या बोदर्डै वंजारी गावात देण्याचा प्रयत्न असेन, एकोप्याने राहून दोन्ही गावांचा विकास करून घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा व मान्यवरांचा वंजारी ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांची प्रतिमा पूजन करण्यात आले, तर आपल्या प्रास्तविकात बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, बोदर्डै वंजारी गाव विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत गावे सुजलाम सुफलाम करण्याचा मानस व्यक्त करून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली,
यावेळी दिपक गिरासे, सी. एम. चौधरी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन व आभार अनिल चौधरी यांनी केले .