जळगावातील पोलीस मैदानात गिरवले वनसंरक्षणाचे धडे
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी कार्यालय, उपवनसंरक्षक, यावल व पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली वनसंरक्षणाकरीता यावल वनविभागमधील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण दि. ५ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आले आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपूर्वी असे प्रशिक्षण देण्यात आले होते. आतादेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी होती. त्यानुसार हा प्रशिक्षण कॅम्प आयोजित होता. शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण हे मुख्यत: पोलीस प्रशिक्षण केंद्र, जळगाव येथे आयोजित करण्यांत आले होते. प्रशिक्षण हे यावल वनविभाग जळगाव मधील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणाकरीता देण्यांत आलेले आहे.
राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, जळगाव यांचेमार्फत शारीरीक कवायत, शस्त्र कवायत तसेच शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण त्यामध्ये पिस्टल उघडणे, गोळ्या भरणे, फायरिंग करणे यासह विविध फायर पोझीशन इत्यादी प्रकारचे सराव यावल वनविभागातील वनक्षेत्रापाल, वनपाल व वनरक्षक यांचे कडून करुन घेण्यात आले आहे.
राखीव वनात उपप्रवेश करुन सोबत शस्त्र घेवून अवैध वृक्षतोड अतिक्रमण व अवैध शिकार करण्यासाठी जे अज्ञात इसम जंगलात त्यांना अटकाव करण्यासाठी तसेच त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी , संरक्षण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे प्रशिक्षण देण्यात आले.