पारोळा (प्रतिनिधी) – येथील तहसीलदार अनिल गवांदे यांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने मालकाने धक्काबुक्की करून त्यांच्या वाहनचालकास मारहाण केल्याची घटना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शिवले नाल्याजवळ घडली.
याबाबत पोलिसात आज ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 15.07.2021 रोजी 00.20 वाजेचे सुमारास मी तसेच शासकीय वाहन क्र एम एच 19 एम 0499 वरील चालक कैलास भिवसन माळी, असे अनाधिकृत गौण खनिज चोरी शोध मोहीम कारवाई करीत असतांना करंजी ता पारोळा गावाच्या पुढे हायवे रोडवरील पेट्रोल पंपाच्या समोर एक निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये मिळुन आलेले अनाधिकृत सुमारे १ ब्रास वाळु बाबत कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर वरील चालक नाव गाव माहीत नाही तसेच ट्रॅक्टर मालक बापु महाजन पुर्ण नाव माहीत नाही. रा. उंदिरखेडा यांनी आम्ही करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून तसेच मला धक्काबुक्की करुन शासकीय वाहनावरील चालक कैलास माळी यास चापटा बुक्यांनी मारहाण करुन आमचे सोबत असलेले माझे सहकारी महेंद्र मुरलीधर पाटील तलाठी शिवरे दिगर, प्रविण परशुराम शिंदे तलाठी बहादरपुर असे त्यास आडविण्यास गेले असता त्यांना लोटुन आम्हाला उद्देशुन तुम्ही जर आमचा पाठलाग केला तर तुम्हाला ह्याच ट्रॅक्टर खाली दाबुन देईल अशी धमकी देवुन सदर वाळुने भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली आमच्या ताब्यातुन पळवुन घेवुन जावुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन माझी सोनालीका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर वरील चालक नाव गाव माहीत नाही व ट्रॅक्टर मालक बापु महाजन पुर्ण नाव माहीत नाही. रा. उंदिरखेडा ता पारोळा यांचे विरूद्ध कायदेशीर फिर्याद आहे.