जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जळगाव परिमंडळ कार्यालय येथे आज आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी जळगाव परिमंडळ उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी मुख्य लिपिक मधुसूदन सामुद्रे, उमेश चौथे, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील, माजी सर्कल अध्यक्ष कॉ.भगवान सपकाळे, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.