जामनेर येथे महाराष्ट्र अंनिसच्या वतीने निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
जामनेर (प्रतिनिधी) : वक्तृत्व आणि निबंध या कला विकसित करायच्या असतील, तर वाचन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जामनेर तालुका शिक्षण विस्तार अधिकारी संजय भानुदास पाटील यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा जामनेरच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.


महा. अंनिस वर्धापन दिन, ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील लेखन कौशल्य वाढावे, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात तालुक्यातील २४ शाळा-महाविद्यालयांतील सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून उषा नारायण सुरळकर, विजय सैतवाल आणि सुभाष मोरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेर शाखेचे अध्यक्ष यु.यु.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय भानुदास पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जळगाव जिल्हा प्रधान सचिव रविंद्र चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेच्या प्रधान सचिव प्रतिभा नरवाडे (दाभाडे) यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष बी.आर. पाटील यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री क्लासेसचे संचालक दिपक अहिरे, महेंद्र केमेस्ट्री क्लासेसचे संचालक महेंद्र व पंकज सुर्यवंशी, ज्ञानसंध्या क्लासेसचे संचालक कैलास सुरळकर, प्रोटॉन क्लासेसचे संचालक दीपक पाटील, गुरुध्वज अकादमीचे विरु सर, सेवा निवृत्त संघाचे अध्यक्ष पं.ना. पाटील आणि महा. अंनिस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी सहकार्य केले.
इ. ५वी ते ७वी (अ गट)
प्रथम: मोहिनी जितेंद्र पाटील, न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी
द्वितीय: चैतन्य राहुल जैन, जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर
तृतीय: तनुश्री ऋषिकेश चौधरी, सरस्वती विद्या मंदिर, शेंदुर्णी
उत्तेजनार्थ: कुणाल मनोज पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर), हर्ष सुनील बारी (लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर), श्रद्धा अनिल रायपुरे (श्रीमती रा.सू. जैन माध्यमिक विद्यालय, तोंडापूर)
इ. ८वी ते १०वी (ब गट)
प्रथम: प्रतीक समाधान चौधरी, आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यामंदिर, शेंदुर्णी
द्वितीय: जान्हवी शंकर बिजागरे, अ. भा. ख. गरुड माध्यमिक विद्यालय, वाकडी
तृतीय: दिव्या सुनील लाजगे, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर
उत्तेजनार्थ: मिताली सुभाष सूर्यवंशी (ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर), कु. वैष्णवी नितीन किटे (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शेंदुर्णी), कु. जागृती सुधीर बोरसे (न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी)
इ. ११वी व १२वी (क गट)
प्रथम: नंदिनी विठ्ठल पवार, इंदिराबाई ललवाणी विद्यालय, जामनेर
द्वितीय: श्रद्धा रवींद्र महाजन, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर
तृतीय: निशा संजय सोनवणे, आर. टी. लेले हायस्कूल, पहूरपेठ
उत्तेजनार्थ: पुनम संदीप खुरपुडे (ललवाणी माध्यमिक विद्यालय, जामनेर), सुहाना युनूस तडवी ( लेले हायस्कूल, पहूरपेठ), भाग्यश्री रमेश पारधी (ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, जामनेर)









