चेन्नई (वृत्तसंस्था) – जोपर्यंत कायदेशीर विवाह होत नाही तोपर्यंत केवळ मोठ्या कालावधीपर्यंत सोबत राहिले म्हणून याचिकाकर्त्यांना कौटुंबिक न्यायालयासमोर वैवाहिक वाद दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार मिळत नाही, असा निर्वाळा मद्रास हायकोर्टाने दिला आहे .
न्या वैद्यनाथन आणि न्या आर. विजयकुमार यांच्या खंडपीठाने कोईंबतूरच्या आर. कलईसेल्वी यांचे अपील फेटाळत हा निर्वाळा दिला कलईसेल्वी यांनी कोईंबतूरच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून घटस्फोट कायदा 1869 चे कलम 32 च्या अंतर्गत दाम्पत्य अधिकार मागितले होते. कौटुंबिक न्यायालयाने 14 फेब्रुवारी 2019 ची याचिका फेटाळली होती. यानंतर हे अपील करण्यात आले. कलईसेल्वी यांनी दावा केला की त्या 2013 पासून जोसफ बेबी सोबत राहात होत्या, परंतु नंतर ते वेगळे झाले.