मुंबई (वृत्तसंस्था ) – वाहतुकीचे नियम मोडणाऱयांवर ई-चलान मशीनद्वारेच कारवाई करण्याचे वाहतूक पोलिसांना आदेश आहेत. मात्र बऱयाच ठिकाणी अधिकारी-कर्मचारी आपल्या खासगी मोबाईलवर नियम मोडणाऱया वाहनांचे फोटो अथवा चित्रीकरण करतात.
याची गंभीर दखल घेण्यात आली असून ई-चलान कारवाई ही मशीनद्वारेच करावी, त्यासाठी खासगी मोबाईलचा वापर करू नये, असे आदेश पुन्हा महामार्ग पोलीस विभागाने दिले आहेत.
विनाहेल्मेट, सिग्नल तोडणे, रॅश ड्रायव्हिंग, विरुद्ध दिशेने जाणे आदी नियम मोडणाऱया वाहनांवर ई-चलानची कारवाई केली जाते. त्यासाठी संबंधित वाहनाचे ई-चलान मशीनद्वारे फोटो अथवा चित्रीकरण करून ते संबंधितांना पुरावा म्हणून पाठवले जाते. अशा प्रकारे कामाचा भाग असतानाही काही पोलीस अधिकारी-कर्मचारी ई-चलान कारवाई करताना मशीनचा वापर न करता स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करतात. आपल्या मोबाईलमध्ये नियम मोडणाऱया वाहनांचे फोटो काढून काही वेळेनंतर ते फोटो ई-चलान मशीनमध्ये अपलोड केले जातात. शिवाय गाडीचा पूर्ण फोटो न टाकता फक्त नंबरप्लेटचा फोटो टाकला जातो. त्यामुळे गाडी कोणती आहे ते ओळखणे कठीण होते, अशा प्रकारचा तक्रार अर्ज महामार्ग पोलिसांकडे आला होता.