भुसावळ तालुक्यातील मुक्ताईनगर रस्त्यावरील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळहून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर गणेश ढाबा (ऑर्डनन्स फॅक्टरी गेटच्या पुढे) समोर एका अज्ञात वाहनाने एक इसमास जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि ५ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर चालक ‘घटनास्थळावर न थांबता वाहनासह फरार झाला. या अपघातात अनोळखी इसम गंभीर होऊन मरण पावला. पोलीस पाटील गिरीष एकनाथ पाटील (वय ५१, रा. दर्यापूर, ता. भुसावळ) यांचे फिर्यादी वरून वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सपोनि अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांनी भेट दिली असून, तपास ग्रेड पो.उ.नि. जितेंद्र जैन (वरणगाव पो.स्टे.) करीत आहे.