चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – कृषी मंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा रोहिणी चौफुली येथे ठिय्या देऊन अडवून भाजपा कार्यकर्ते यांनी त्यांना आज निवेदन दिले.


रोहिणी रेल्वे अंडरपासमध्ये पाणी तुबल्यामुळे 8 गावांचा चाळीसगांव तालुक्याशी संपर्क तुटला आहे , सभोवतालच्या पिंपळगाव, राजदेरे, राजदेहरे, तुका तांडा, राहदेहरे गावठाण तांडा, राजदेहरे सेटलमेंट, घोडेगाव, खराडी, शिंदी, जूनपणी, ओढरे, करजगाव, पाटणा इत्यादी गावांचा चाळीसगांव शहराशी संपर्क तुटला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सभोवलच्या परिसरातील ग्रामस्थांना व रुग्णांना अडचणी उद्भवत आहे. उपचाराआभावी एखाद्या पेशन्ट चा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांना या समस्या सोडवण्याकडे लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली त्यांना रोहिणी रेल्वे गेटजवळ नेऊन स्थिती दाखवण्यात आली.
त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ रेल्वे गेट खुले करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.. ढगफुटी व निसर्गाचा प्रकोप होऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जमिनीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून परिसरातील रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हान, पिंपळवाड, तळेगाव, कृष्णातांडा, करंजगाव , घोडेगाव, खराडी, पिंपळगाव, जुनापाणी , राजदेहरे सेटलमेंट, तांडा , म्हारवाडी इत्यादी गावांमध्ये पंचनामे करून सरसकट मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा चाळीसगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल नागरे, भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस नितिन सोनवणे, वाल्मिक नागरे, माजी उपसरपंच प्रकाश सगळे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, युवा मोर्चा चिटणीस दीपक घुगे, युवा शाखा अध्यक्ष विनोद चौधरी, घनश्याम डिघोळे, रामहरी ताठे, भावलाल नागरे व शेतकऱ्यांनी भुसे यांच्याकडे केली त्यांनी सरसकट मदत देऊ असे आश्वासन दिले.
अधिकारी ठराविकच पंचनामे करून वेळ मारून नेत आहेत , हे बरोबर नाही शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेतून भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन रास्ता रोको केला त्यावेळेस तहसीलदार अमोल मोरे यांनी फोनवरून तलाठी चव्हाण यांच्यामार्फत सविस्तर पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देऊ ही मागणी मान्य केली.








