जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज सायंकाळी 5.00 वाजेपासून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.
नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही त्यांनी कळविले आहे.