पारोळा तालुक्यातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- सुरत येथील रहिवासी रोहन श्रावण भोई हा आपल्या वडिलांसोबत चुलत भावाच्या घरभरणीसाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात असतांना पारोळा तालुक्यातील कारंजी गावाजवळ अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवार दि.२१ रोजी सकाळी ७.३० वाजता कारंजी गावाजवळील उड्डाण पुलावर बुलेट (क्र. जि.जे.०५ एन टी ५२२६) चा अपघात झाला. त्यात रोहन भोई (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेले श्रावण भोई यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. दरम्यान, अपघात कसा झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या बाबत पारोळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पारोळा पोलीस करत आहे.