नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने समाजवादी पक्ष आणि बसपाचे 10 आमदार फोडले आहेत . हे आमदार उद्या भाजपमध्ये सामील होणार आहेत.
सपाच्या सदस्यांना भाजपमध्ये घेण्यात उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
सपाचे रविशंकर सिंह पप्पू, सीपी चंद, अक्षय प्रसाद सिंह आणि बसपाचे बृजेश कुमार सिंह यांच्यासह 10 आमदार भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.
ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्या भागात चांगला प्रभाव आहे, अशा नेत्यांना निवडणुकीपूर्वीच फोडण्याच्या भाजपचा प्रयत्नात आहे. ही भाजपची यशस्वी ठरलेली रणनीती आहे यामुळे 2022 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा ही रणनीती वापरण्याच्या तयारीत आहे. यावेळी समाजवादी पक्ष आणि त्यांचे नेते भाजपच्या निशाण्यावर आहेत. कारण पक्षाचे ध्येय विधानसभा निवडणूक जिंकणे हेच आहे. मग तो उमेदवार स्वतःचा असो अथवा दुसऱ्या पक्षातून आलेला.