जळगाव (प्रतिनिधी) – रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कला वाणिज्य आणि विज्ञान व महाविद्यालय धरणगाव, ग्रामीण रुग्णालय, धरणगाव तर्फे दिनांक 4 डिसेंबर 2024 राष्ट्रिय जंतनाशक दिन व जागतिक एड्स दिन सप्ताह निमित्त राष्ट्रिय जंतनाशक नियंत्रण व एचआयव्ही जनजागृतीपर माहिती मार्गदर्शन , प्रतिज्ञा, रांगोळी व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सन्माननीय तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी,डॉ. मनोज पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर मयूर जैन, महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. उदय जगताप सर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपप्राचार्या आर.पी.चौधरी मॅडम, प्र. डी. डी. पाटील, कार्यक्रम अधिकारी व रेड रिबन क्लब चे प्रमुख डॉ.अभिजित जोशी, कार्यक्रमाधिकारी डॉ. एस . झेड. पाटील, प्रा. राखी पाटील, प्रा.एन. डी. पाटील, प्रा. नेत्रा पवार , महाविद्यालयीन शिक्षक वृंद ,डॉक्टर, कर्मचारी व विद्यार्थी , सामान्य कार्य करते त्यांच्या उपस्थितीत जागतिक एड्स दिनाची जाहिर प्रतिज्ञा घेण्यात येवून घोषणांच्या प्रचाराने कार्यक्रमाला मोठा उत्साहाने सुरुवात करण्यात आली.
दरवर्षी ४ डिसेंबर हा राष्ट्रिय जंतनाशक दिंन म्हणुन साजरा केला जातो. तसेच १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या प्रति आपुलकी दाखवणे कलंक व भेदभाव नष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे. संपुर्ण जिल्ह्यामध्ये या पंधरवड्यात पोस्टर, रांगोळी तसेच जनजागृतीपर कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले गेले. या वर्षीच्या एड्स दिनाचे ‘TAKE THE RIGHTS PATH ( मार्ग हककाचा,सन्मानाचा!) हे ब्रीदवाक्य आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, आयसीटीसी विभाग या केंद्रामध्ये मोफत एचआयव्ही समुद्रेशन व चाचणी केली जाते.तर एआरटी केंद्रांमधून एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दर महिन्याला मोफत औषध पुरवठा व उपचार केले जातात. जिल्ह्यामध्ये २३ आयसीटीसी केंद्रे व २ एआरटी केंद्रे कार्यान्वित आहेत.एड्स नियंत्रणाच्या या टप्प्यात आयसीटीसी केंद्रावर भर दिला गेला. सद्यस्थितीत नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी कमी झालेली आहे हे अशादायक आहे. ही आकडेवारी कमी करण्यासाठी समुपदेशन व चाचणी केंद्र, एआरटी केंद्र,एड्स नियंत्रण पथक रक्तपेढी, डी.एस.आर.सी विभाग या विभागांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.
अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी छोट्या छोट्या सवयीतून आपण स्वच्छता पाळू शकतो व स्वच्छता हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला धरणगाव तालुक्यातील तहसीलदार मा. महेंद्र सूर्यवंशी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण वैद्यकिय अधिकारी, डॉ. मयुर जैन, डॉ. जितेंद्र चव्हाण , रेड रिबन क्लब प्रमुख श्री. अभिजित जोशी सर,आयसीटीसी समुपदेशक डी.जी. शिंपी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आर. ए. काकडे,प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर वन स्टॉप विभाग अंतर्गत फिल्ड वर्कर श्री संकेत वारूळकर चौधरी,साने गुरुजी फाउंडेशन लिंक वर्कर श्रीमती अश्विनी शिंपी, आरोग्य निरीक्षक श्री. ए.एस.भोई, आरोग्य सेवक रियाज देशमुख , ए. एन.एम श्रीमती किरण सोनार सिस्टर, दिपा मोरवकर सिस्टर, भदाने सिस्टर, समस्त सहकारी शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.