पुणे जिल्ह्यातून जनसाहस फाऊंडेशनच्या सहकार्याने कुटुंबीयांची सुटका
जळगाव (प्रतिनिधी) : ऊस तोडणीच्या कामानिमित्ताने अनेक कामगार बाहेर स्थलांतर करत असतात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगावसह इतर तालुक्यातील सहा ते सात ऊसतोड कामगारांचे कुटुंब पुणे जिल्ह्यात गेले होते. यानंतर या कुटुंबांना पुणे जिल्ह्यातील वाळकी येथे डांबून ठेवण्यात आले होते. या कामगारांना जन साहस फाउंडेशनच्या प्रयत्नातून सुटका करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगाव तसेच वेगवेगळ्या तालुक्यातील कामगारांना ऊसतोडणीचे काम करण्याच्या निमित्ताने ठेकेदाराने पुणे जिल्ह्यातील वाळकी या गावात नेण्यात आले होते. या ठिकाणी नेल्यानंतर मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात कामगारांना ऊस तोडणीचे काम न सांगता वेगळ्या कामाला लावण्यात आलं. मात्र उसतोडणीचे काम दिले जात नसल्याने या कामगारांनी ठेकेदाराला विचारणा केली असता दमदाटी करण्यात आली.(केसीएन)तर सदरचा प्रकार लक्षात आल्यावर कामगारांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दमदाटी तसेच धमकी देण्यात आली होती. यादरम्यान कामगारांनी पुन्हा गावी जाऊ नये म्हणून त्यांना गावातच डांबून ठेवण्यात आले होते.
दरम्यान यातील काही कामगारांनी जन साहस फाउंडेशनच्या हेल्पलाइन नंबरवर घडल्या प्रकाराबाबत तक्रार केली होती. त्यानुसार जन साहस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी तसेच पोलिसांची मदत घेत सोडविण्याचे प्रयत्न केले. ठेकेदाराकडून ऊसतोडीचे काम सांगून कामगारांना नेण्यात आले. मात्र ते सोडून वेगळीच काम कामगारांना करायला भाग पाडल्याचे याठिकाणी सांगण्यात आले.(केसीएन)यानंतर गावात पोहचत सर्व कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावी आणले आहे. कामगारांना गावी आणल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच विधी सेवा प्राधिकरण यांची भेट घेऊन त्यांना प्रकार कळविण्यात आला आहे.