‘ईश्वरचिठ्ठी’ने शिरसोलीला मविआची झाली सरशी
जळगाव (प्रतिनिधी) :- शिरसोली प्र बो ग्रामपंचायत सरपंचपदाच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीत जनसेवा पॅनलच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे अर्जुन पवार यांच्या पत्नी उषा अर्जुन पवार यांची निवड झाली.या वेळी दोन्ही गटाच्या उमेदवाराना आठ-आठ मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात उषा अर्जुन पवार याची यांची सरपंचपदी निवड झाली.
शिरसोली प्र बो येथील सरपंच सिमा पाटील यांनी सरपंचपदाचा राजी नामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत मध्ये ऐकुन १७ ग्रामपंचायत सदस्य असून एका सदस्याने राजीनामा दिल्याने १६ सदस्य संख्या आहे. सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. सरपंच पदासाठी उषा अर्जुन पवार तर विरोधात नितीन बुंधे यांचा समोरासमोर अर्ज होता. दोघांनाही समसमान आठ मते मिळाले. त्यामुळे लहान मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या वेळी उषा अर्जुन पवार यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना सरपंच म्हणून निवडणुक निर्णय अधिकारी अजिंक्य आंधळे यांनी विजयी घोषित केले. या वेळी समर्थकांनी एकच जल्लोष केले. या वेळी ग्रा.प.सदस्य प्रदीप रावसाहेब पाटील, दिगंबर बारी, शितल खलसे, आशाबाई बारी , रईस शेख, समाधान जाधव, कमलबाई कोळी यांच्यासह सोळा सदस्य हजर होते.
निवडणुक निर्णय अधिकारी मंडळाधिकारी सारीका दुरगुडे, डी.जे. पाटे, मयुर महाले यांच्यासह उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख उमेश रावसाहेब पाटील, विकास पाटील,रतन बारी, राजु बारी, निलेश खलसे, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नवनिर्वाचित सरपंच उषाताई अर्जुन पवार यांचे अभिनंदन केले.