यावल (प्रतिनिधी) – उसनवारीने पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना यावल तालुक्यातील हंबर्डी येथे घडली. फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सूपडू सावकारे (वय-३० , रा. हंबर्डी ) हे २४ ऑक्टोबररोजी तडवीवाड्यात गप्पा मारत असतांना सलदार बलदार तडवी याने महेशकडे उसनवारीने पैसे मागितले. महेशने पैसे देण्यास नकार दिल्याने सलदार तडवी, शावखॉ तडवी आणि लुकमान तडवी ( तिघे रा. हंबर्डी ) यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात महेश यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सरदास करीत आहेत.