उरण (वृत्तसंस्था ) ;– रायगड जिल्ह्यातील उरण येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीचा चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह आढळला आहे. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या १५ व्या वर्षी यशश्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याला पॉक्सो अंतर्गत जेल झाली होती. . यशश्री शिंदे कॉमर्सचं शिक्षण घेत होती. शिक्षणासह ती खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करायची. गुरुवारी ती आई वडिलांना बाहेर जाते सांगून घरातून निघाली आणि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. रात्री उशीरापर्यंत मुलगी परतली नाही तेव्हा वडिलांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.
यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आले. तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावर टॅटूने तिची ओळख पटली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी संशयित म्हणून दाऊद शेखचं नाव पोलिसांना सांगितले.
दाऊद शेख हा व्यवसायाने ड्रायव्हर असून २०१८ मध्ये त्याने १५ वर्षीय यशश्री शिंदेला पाहिले आणि तिला टार्गेट करणं सुरू केले. तिला आपल्या जाळ्यात ओढत २०१९ मध्ये यशश्रीचं शारिरीक शोषण केले. कुटुंबाने दाऊदविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक करून जेलला पाठवले. मात्र जेलच्या बाहेर निघाल्यानंतर दाऊद पुन्हा यशश्रीचा पाठलाग करू लागला. दाऊदनेच तिचं अपहरण करून हत्याचा केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. संशयित आरोपी बंगळुरू येथील असल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनी आरोपीला नुकतेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे.