अलाहाबाद ;- कोरोनाने उत्तर प्रदेशात आपले हातपाय पसरले असून याच्या आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अखिलेश यादव पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबत उपमुख्यमंत्री शर्मा यांनी स्वत: सोशल मेडियातून देत आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच कोरोनाच्या बाबतीत राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन केले आहे.

त्याचबरोबर राज्यातील विविध तीन जिल्ह्यांचे जिल्हा पोलिसप्रमुख यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात उन्नावचे पोलिसप्रमुख सुरेश राव ए. कुलकर्णी, कासगंजचे एसपी मनोज कुमार सोनकर आणि सोनभद्र या जिल्ह्याचे एसपी कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांचा पदभार इतर आयपीएस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.







