शिंदी ता. चाळीसगाव ;- बंजारा समाजाच्या तालुक्यातील सर्व तांडे वस्त्या रस्त्यांच्या माध्यमातून शहराला जोडण्यासाठी प्रगतीशील राहिलो. आज अधिकाधिक तांडे शहराला जोडले गेल्याने माझा बंजारा समाजाला दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. विद्यार्थी, रुग्णांना शहरात येणे सोपेझाले आहे. शासनाची कुठलीही योजना असेल त्याचा लाभ समाजाला कसा होईल यासाठी सातत्याने शिबिरे व जत्राच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. संजय गांधी निराधार योजना व बांधकाम कामगार ऊसतोडणी कामगारांची नोंदणी असो बंजारा समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटलो आहे. समाजाने देखील मला खूप प्रेम दिल्याने आज मी आमदार, खासदार होऊ शकलो. बंजारा समाजाची माझ्या असलेली नाळ ही आयुष्यभर जपून ठेवणार असून समाजाच्या उत्कर्षासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे दिली.
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिंदी ता. चाळीसगाव येथे उन्मेश दादा मित्र परिवार, जय सेवालाल मिञ मंडळाच्या वतीने मिष्ठान्न तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख अतिथी पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करनदादा पवार तर उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष राकेश देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्रभाऊ राठोड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष के बी साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, पंस माजी सदस्य रवींद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन ,शेषराव चव्हाण, सरपंच अहिल्याबाई सोनवणे, माजी पंससदस्य बाळासाहेब राऊत, युवा मोर्चाचे कपिल पाटील, कल्पेश मालपुरे, बबडी शेख, सर्वेश पिंगळे, तांबोळे माजी सरपंच अनिल पाटील, ग्रामीण पा.पु. अभियंता अनिल चव्हाण, कैलास गावडे, शरद पाटील, दिनकर राठोड, महेंद्र राठोड, सरपंच गुलाब राठोड, सरपंच जगन पवार, उपसरपंच संग्राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य नामदेव तिकांडे, पंकज गरुड, ज्ञानेश्वर पिलोरे, दिलीप कोकणे, आप्पा जाधव, दिलीप राठोड, जनार्दन ढोणे, विनित राठोड, अविनाश राठोड, भाऊसाहेब नवले, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर ठाकरे, गोरख राठोड, ग्रा. पं. सदस्य अनिल चव्हाण, भास्कर सोनवणे कार्यकर्ते पदाधिकारी परिसरातील ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव पाटणा गटातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख राठोड यांनी केले ते म्हणाले की उन्मेशदादा पाटील यांनी विकासाचे कामे देताना सदैव बंजारा समाजाला झुकते माप दिले आहे. त्यामुळे खासदार उन्मेशदादा पाटील व सौ संपदा पाटील या आमच्या समाजात लोकप्रिय व्यक्तिमत्व असून त्यांच्याशी समाजाच्या विश्वासाचे नाते वाढत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. नगराध्यक्ष करन दादा पवार म्हणाले की उन्मेश दादा पाटील यांच्यासारखे माझे राजकरणात शेकडो मित्र असले माझे नेते उन्मेश दादा असून त्यांच्या मार्गदर्शनात मी पारोळा नगरीचा चौफेर विकास करू शकलो याचा मला अभिमान आहे. यावेळी सौ. संपदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की खासदार उन्मेश दादा पाटील यांचा हा जो विकासाचा प्रवास आहे हा अतिशय खडतर आहे यासाठी बंजारा समाज बांधवांची वेळोवेळी मिळालेली साथ मिळालेले प्रेम हीच आमच्यासारखी साठी ऊर्जा असून बंजारा समाजाचे माझे वैयक्तिक प्रेम निभावण्याचा प्रयत्न केला आहे. सणासुदीला मी न चुकता दरवर्षी जूनपाणी, शिंदी यासह परिसरातल्या बंजारा तांडावर जाऊन माझ्या बंजारा माता भगिनींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहत नाही याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. के बी साळुंखे, शिवाजी घाडगे, यांनी मनोगत व्यक्त केले. डोंगर-दऱ्या वस्ती तांड्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा मिष्ठान्न तुला कार्यक्रम झाल्याने परिसरात याची मोठी चर्चा झाली.







