डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिर
रुग्णांनी लाभ घेण्याचे आव्हान
जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयात व्हेरिकोज व्हेन्स आजार असणाऱ्यांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत सोनोग्राफी विभागात व्हेरिकोज व्हेन्सची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत.
हिवाळ्याच्या थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन होते आणि रक्तप्रवाह मंद होऊ शकतो. यामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास वाढू शकतो. थंड वातावरणामुळे शिरा आकुंचतात आणि रक्तप्रवाह बंद होतो. थंडीमुळे चालणे व इतर व्यायाम कमी होतो. ज्यामुळे पायात रक्त साचण्याची शक्यता वाढते. बसून राहण्याची वेळ वाढल्याने वेरिकोज व्हेन्सची लक्षणे वाढतात. पायात जडपणा येणे, शिरा उठून दिसणे, रात्री पायात कळा येणे, सूज आणि खाज सुटणे आदी लक्षणे व्हेरिकोज व्हेन्सची आहेत.
इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. राजकिरण राठी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रमेश इंगळे, डॉ. महेश मुरमे, डॉ.अनुपम सोनवणे आदी तज्ज्ञ हे शिबिरात रुग्णांना तपासणार आहेत. रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अनुपम सोनवणे, डॉ. अंशुल ओछानी (९११२८३१३१५) डॉ.यास्मिन शेख (७०५८०८५३७१) यांनी केले आहे.









