जळगाव – डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात भूमी पॉलिमर प्रा.लि.राजकोट कंपनीतर्फे आयोजित परिसर मुलाखतीतून दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यावेळी भूमी कंपनीचे स्टेट हेड मार्केटिंग मॅनेजर आत्माराम साळवे हे उपस्थीत होते. यात सादरीकरण, विषय ज्ञान, प्रात्याक्षिक ज्ञान, सकारात्मक दृष्टीकोन तपासून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कृषी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, उपप्राचार्य के.पी.ढाके, उपकुलसचिव अतुल बोंडे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.परिस यादव, प्रा.आम्रपाल खिरडी, प्रा.संजय सपकाळे यांनी सहकार्य केले.