जळगाव ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीच्या आवाहनांप्रमाणे उद्या राज्यव्यापी बंद जनतेने जिल्ह्यात यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा शिवसेनेने केले आहे

न्याय्य मागण्यांसाठी वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील आंदोलनात भरधाव कार घुसवून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या आशिष मिश्रा नामक मुलाने निष्पाप शेतकऱ्यांची चिरडून निर्घृण हत्या करून देशाच्या पोशिंद्याच्या प्रती असंवेदनशीलता दाखवली. या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर ताबडतोब राजीनामा द्यावा. अंबाला (हरियाणा) येथील शेतकरी आंदोलनात लखीमपूर खिरीणाची पुनरावृत्ती करणाऱ्या कुरुक्षेत्रच्या भाजप खासदार नायब सैनीचा तीव्र निषेध करून केवळ भांडवलदारांचेच हित जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी शिवसैनिक म्हणून आम्ही मागणी करीत आहोत.
या घटनेचा जाहीर निषेध म्हणून सत्तारूढ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबररोजी राज्यव्यापी बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व शिवसैनिकांना व नागरिकांना विनंती की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये १००% कडकडीत बंद पाळून सहकार्य करावे व हा बंद यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे .
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत , सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने व विष्णू भंगाळे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती महानंदा पाटील , महिला आघाडी उप जिल्हा प्रमुख प्रतिभा पाटील , युवासेना जिल्हाधिकारी शिवराज पाटील , चाळीसगावचे उप जिल्हाप्रमुख आर.एल पाटील , एरंडोलचे विधान सभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील , चाळीसगावचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव कलाने , चाळीसगावचे शहर प्रमुख नाना कुमावत , एरंडोलचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील , पारोळा तालुका प्रमुख आर. बी.पाटील , चाळीसगावचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, भडगांव तालुका प्रमुख डॉ.विलास पाटील , चाळीसगावच्या महिला आघाडी प्रमुख सविता कुमावत व शिवसेना, युवासेना, महीला आघाडी पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.







