अजिंठा फिल्म सोसायटीतर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : अजिंठा फिल्म सोसायटीद्वारा टूरिंग टॉकीज हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या महिन्याच्या टुरिंग टॉकीज मध्ये रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शो मॅन राज कपूर यांचा गाजलेला ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
पहिल्या टुरींग टाँकीज मध्ये शो मँन राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्री ४२० या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. रसिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दुसऱ्या टुरींग उपक्रमात आवारा या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. रसिकांना हा आनंद कायम घेता यावा म्हणून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी शहरातील मध्यवर्ती भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटर येथे टुरिंग टॉकीज उपक्रमाचे आयोजन फिल्म सोसायटी द्वारा करण्यात येणार आहे. या महिन्याच्या टुरिंग टॉकीज मध्ये रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शो मॅन राज कपूर यांचा गाजलेला ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
शहरातील विजया केसरी प्रतिष्ठान या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. याप्रसंगी चित्रपट आस्वादासोबतच चित्रपटाची कथा ,पटकथा ,दिग्दर्शन, सिनेमेटोग्राफी यासंदर्भात खुली चर्चा देखील आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत पुढील वर्षभरात विविध विषयांचे,आषयांचे, विविध भाषांचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या सह सचिव विनीत जोशी, संतोष सोनवणे, रजत भोळे, पार्थ ठाकर, गणेश देसले यांनी केले आहे.