जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील रिगरोड येथील आयकॉन हेल्थ केअर सर्विसेस अँड डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात करण्यात आला.
यावेळी लोक संघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, अरुश्री हाँस्पटल चे संचालक डॉ. परिक्षीत बाविस्कर, डॉ स्वाती बाविस्कर, बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील दसोरे,डॉ. शाहरुख शेख,डॉ. नाजुका जाधव,जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक सतिष मदाणे,जळगाव जनता सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर सुनिल अग्रवाल , सचिन धांडे, चंदन कोल्हे,नवलसिंग राजे आयकॉन हेल्थ केअर सर्विसेस अँड डायग्नोस्टिक सेंटरचे सीईओ विशाल शिंदे,डॉ. योगिता शिंदे,योगेश बाविस्कर, उपस्थित होते.
उपलब्ध सुविधा
उपलब्ध तज्ञ डॉक्टर सुविधा जनरल मेडिसिन, अस्थिरोग,न्युरो सर्जन,हृदयरोग,जनरल सर्जन,त्वचा रोग,दमा टीबी, किडनि रोग,मुख रोग,नाक कान घसा रोग तज्ञ, व कोरोना नंतर होणाऱ्या आजाराचे मार्गदर्शन केंद्र ( कोरोना नंतर होणारे डायबेटीस चे आजार, म्युकोरमायकोसीस,दमा, फुफुसांचा फायब्रोसिस,यांच्या बद्दलचे मार्गदर्शन केंद्र)
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शैलेंद्र सोनवणे,विजय पाटील,राजेश पाटील,राकेश मोरे, लवकुमार पाटील, अश्विनी पाटील, शितल बडगुजर, राधा पावरा,मयूर पाटील, वाजीद खान,समाधान शिंदे ,महेंद्र पाटील यांनी काम पाहिले.