चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्याजवळील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : मेहुणबारे येथे आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील कळमडू येथील पती- पत्नी आणि मुलगा बाजारात गेले होते. बाजार करून झाल्यानंतर घरी परतताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून जाताना उभ्या ट्रकला धडकून बापलेकाचा मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ हा अपघात घडला. कळमडू येथे सालदार म्हणून काम करणारा मोतीराम पावरा (वय ४५) हे पत्नी, मुलगा विकी व मुलीसह शेतातच वास्तव्यास आहेत. शुक्रवारचा बाजार असल्याने ते पत्नी व मुलांना घेऊन बाजारात आले होते. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकली. यात मोतीराम पावरा, त्यांचा मुलगा विकी पावरा (वय १०) हे दोघे जागीच ठार झाले.याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.