जळगाव शहरातील संतापजनक प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात एका ११ वर्षीय मुलीला घरात कोंडून ४० वर्षीय व्यक्तीने तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शहरातील रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत १७ दिवसांनी उघडकीस आली आहे. या संतापजनक प्रकाराबाबत बुधवारी दि. २८ रोजी संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मुंबईहून पोलिसांनी अटक केली आहे.
पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे (वय ४०) याच्या मुलासोबत अकरा वर्षाची शेजारी राहणारी मुलगी आणि काही मुलं लपंडावाचा खेळ खेळत होती.(केसीएन) तेव्हा संबधित मुलगी संशयित आरोपीच्या घरात लपायला गेली होती. त्याच वेळेस सिद्धार्थ वानखेडे हा घरात आला. त्याने त्या मुलीला पाहिल्यानंतर घराचा दरवाजा बंद केला. तसेच घरातील सर्व लाईट देखील बंद करत, मुलीवर अत्याचार केले.
तसेच पिडीत मुलीने आरडाओरड केला. तेव्हा संशयित आरोपीच्या हातावर नखांनी ओरखडले. संशयिताने मुलीचे तोंड दाबून, तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत, शांत राहण्यास सांगितले. ही माहिती काही दिवसानंतर पिडीत मुलीच्या आई-वडिलांना कळल्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिस स्टेशन संबधितावर भारतीय न्याय संहिता कलमानुसार ६३ (बी), ६५ (२)७४,७६,१२७ (१), ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (केसीएन)संशयित आरोपी सिध्दार्थ वानखेडे काही दिवसांपासून मुंबईला पळून गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी मुंबईहून अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली आहे.