जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शासकीय अजिंठा विश्रामगृहात काही राजकीय व्यक्तींकडून एका तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत . या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे . पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे . विश्रामगृहात कथित खोली कुणाच्या नावावर नोंदणी झालेली होती यासह थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून विश्रामगृहात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी करावी संशयित आरोपी मोठे राजकीय उच्चपदस्थ असल्याची चर्चा आहे त्यामुळे पोलिसांनी सत्य स्पष्ट करावे असे या निवेदनात म्हटले आहे.