जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील घटना

तुरखेडा येथील रहिवासी असलेले रमेश उत्तम धीवर (वय ७४, रा तुरखेडा, ता. जळगाव) यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मात्र हवे तसे उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावर कर्ज वाढत गेले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते असायचे. त्यात त्यांनी सोमवारी शेतात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या मुलाच्या लक्षात आला. त्या वेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत. शेतकऱ्याचे आत्महत्येमुळे तुरखेडा गावामध्ये शोककळा पसरली आहे.









