जळगाव सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका सरकारी नोकराला ‘ट्रेडींग’ मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ट्रेडींग’मध्ये पैसा कमाविण्याचे आमिष दाखवत सरकारी नोकरी करत असलेल्या राजेंद्र सुरेश बाविस्कर (वय ४२) यांची ७ लाख ६७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी उघडकीस आली. अव्दैत खन्ना, इशिता व अनिज बक्षी यांनी एका व्हॉट्सॲप क्रमाकांवरुन ट्रेडींग इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बहाण्याने २७ डिसेंबर २०२३ ते २६ मार्च २०२४ दरम्यान एकूण ७ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. मात्र, परत रक्कम न मिळाल्याने राजेंद्र बाविस्कर यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिस निरीक्षक किसननजन पाटील हे तपास करत आहेत.