जळगाव ( प्रतिनिधी ) – दोन दिवसांपूर्वी वाकोद शिवारात ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण करून लुटणारे ५ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत . त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे .
३० डिसेंबररोजी रात्री वाकोद शिवारात बाघुर नदीच्या पुलाजवळ परतुरवरून जळगावकडे रिकामी ट्रक ( क्र. एमएच १९/ सोवाय ६३८६ ) येत असतांना दोन मोटारसायकलवर अज्ञात आरोपीनी ट्रक अडवून ट्रकचालक, क्लिनर यांना मारहाण करून त्यांचे दोन मोबाईल हिसकावून पळून गेले होते पहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९४ / २०२१ प्रमाणे ३१ डिसेंबररोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले व पोलोस पथकातील पोउनि अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकों विनोद पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी यांनी अज्ञात आरोपीनी नेमका हाच ट्रक का अडविली असा संशय आल्याने त्याप्रमाणे माहिती घेतली भाग्यश्री पालोमर्स ( उमाळा ) या कंपनीच्या ट्रक माल खाली करून येतांना त्यांचेकडे मोठ्या प्रमाणात मालाचे रोख पैसे असतात अशा हेतूने चोरांनी हा गुन्हा केला असावा अशी माहिती मिळाली लुटलेल्या ट्रकच्या कंपनीत भेट देवून तेथे काम करणारांची माहिती घेवून तोंडापुर व बाकोद भागातील ट्रक ड्रायव्हर यांची गोपनिय माहिती काढून त्याप्रमाणे काही संशयीत इसमांचे फोटो प्राप्त करुन ते फिर्यादीस दाखविले असता त्यातील एका इसमास फिर्यादीने ओळखले. त्यानुसार पो नि किरणकुमार बकाले यांनी गोपनिय बातमीदार नेमुन त्यांना फिर्यादाने ओळखलेल्या अज्ञात आरोपीचा फोटो दाखविला गोपनिय बातमोदारामार्फत फिर्यादीने ओळखलेला इसम व त्याचे साथीदार गोद्री ( ता. जामनेर)वरुन फत्तेपुरकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथक फत्तेपुर येथे गेले व फत्तेपुर येथे सापळा रचून ५ संशयीतांना ताब्यात घेत विचारपुस केली त्यांनी गुन्हा कबुल केला व गुन्हयांत हिसकावून घेतलेले १६.०००/- रुपयाचे ०२ मोबाईल काढून दिले गुन्हयांत वापरलेल्या हिरो फॅशन व बजाज पल्सर मोटार सायककलसुध्दा त्यांचेकडून जप्त करण्यात आल्या या ५ आरोपींना पहूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.