जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ जळगाव महामार्गावर ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबून ट्रक थांबवल्याने मागून येणारे एसटी बस धडकून झालेल्या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी दोन वाजून वीस मिनिटांनी घडली. या प्रकरणी एसटी बस चालकांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कमलेश संत बहादुर सिंग राहणार मिर्जापुर उत्तर प्रदेश हा ट्रक क्रमांक एम एच 40 सीएम 75 41 वरील चालकाने ट्रक जोरात चालवून अचानक ब्रेक मारून ट्रक थांबवल्याने मागून येणाऱ्या मुक्ताईनगर जळगाव बसची ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाले तसेच बसचे काही प्रमाणात नुकसान झाले. ही घटना भुसावळ जळगाव रस्त्यावरील चांडक कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकारे बस चालक नितेश जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक कमलेश संत बहादुर सिंग यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहे कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.