चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्याची ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी टोळी चाळीसगाव शहर पोलीसांनी जेरबंद केली आहे. टोळीतील तीन संशयित आरोपी हे चाळीसगाव तालुक्यातीलच आहेत. एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी शेतकरी प्रकाश भावसींग पाटील (रा. कोदगाव ता. चाळीसगाव) यांचे मालकीची ट्राली तिचेवर ‘अंबीका ट्रॉली’ नाव असलेली निळ्या रंगाची हि फिर्यादीचे कोदगाव येथील खळ्यात लावलेली असतांना, दि.१६ सप्टेंबर रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे चोरी करुन नेली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे पथक रवाना केले.
गुन्ह्यात भुषण रविंद्र पाटील (रा. कोदगाव ता. चाळीसगाव), कन्हैय्या उर्फ कनु शेषराव देशमुख (रा. विजयसिंग राजपुत नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव), गणेश बापु एरंडे (रा. खरजई ता. चाळीसगाव) अशांना दिनांक २२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील गेला मुद्देमाल ट्रॉलीसह ट्रॉली चोरुन नेण्यासाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर यांचेसह एकुण ४ लाख ८० हजार रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढिल तपास सुरु असुन फरार आरोपीचां शोध घेणे सुरु आहे.
पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. जळगाव यांचेकडील पोहेकॉ. संदीप पाटील, पोना महेश पाटील, पोकाँ सागर पाटील तसेच शहर पो.स्टे. कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोउपनि. संदीप घुले, स. फौ. विश्वास पाटील, पोहेकाँ. राहुल सोनवणे, पोना, भुषण पाटील, पोकों. आशुतोष सोनवणे, पोकाँ रविंद्र बच्छे, पोकों, विजय पाटील, पोकाँ पवन पाटील, पोकॉ अमोल पाटील, पोकाँ गोपाल पाटील, पोकों शरद पाटील, पोकों मोहन सुर्यवंशी, पोकों नंदु महाजन अशा संयुक्त पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कारवाई केली आहे.