शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलावरील घटना, पती गंभीर
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शहरातील प्रमुख टॉवर चौकात दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता घडली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वंदना अशोक गोराडे (वय-४९, रा. राणीचे बांबरुड ता. पाचोरा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती अशोक सुखदेव गोराडे (वय-६०) हे गंभीर जखमी झाले आहे. मयताच्या पश्चात एक मुलगा अविनाश, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. (केसीएन) राणीचे बांबरुड येथे अशोक सुखदेव गोराडे हे पत्नी वंदना गोराडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या चालकाच्या मुलाचे साखरपुडाचा कार्यक्रम असल्या कारणामुळे ते पत्नी वंदना गोराडे यांच्यासोबत शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजे ४७९६) ने जळगावातील टॉवर चौकाकडून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून जात होते.
त्यावेळी भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच २१ एबी ७४६६)ने जोरदार धडक दिली. (केसीएन)या भीषण अपघातात वंदनाबाई गोराडे या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला तर जखमी अशोक गोराडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.