जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूण परिसरातील आदीशक्ती चौकात सिमेंटचे पाईप घेऊन जाणारा ट्रॅक्टर पाईप लाईनच्या चारीमध्ये फसल्याने या भागात वाहतूक खोळंबली आहे. नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आज दुपारी १२ . ३० वाजेच्या सुमारास हे ट्रॅक्टर ( जी जे २० – एन – ०१९५ ) भूमिगत गटारीसाठी सिमेंटचे पाईप घेऊन जात होते . या भागातील रस्त्यांकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होतअसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.